माझ्या घरी येऊ नका; राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा

Update: 2022-06-12 14:56 GMT

"जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या वाढदिवसाला कुणीही भेटायला येऊ नका, " असे  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वाढदिवसानिमित्त  मनसैनिकांना आवाहन केले आहे. सोशल मीडियावर एक ऑडिओ  पोस्ट करत राज ठाकरेंनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे. 

आपल्या ऑडियो पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले, "14 तारखेला भेटायला घरी येऊ नका. जिथे आहात तिथून शुभेच्छा द्या. कारण गेल्या अनेक दिवसांपासून माझी शस्त्रक्रिया पुढे ढकलते आहे. मध्यल्या काळात रुग्णालयात दाखल झालो पण कोरोनाचे डेड सेल्स सापडल्याने शस्त्रक्रिया रद्द झाली.  आता ही शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात पार पडणार आहे. आता पुन्हा तोच प्रकार नको  म्हणून यावेळी वाढदिवशी  कार्यकर्त्यांना भेटणार नाही. जिथून आहात तिथूनच शुभेच्छा द्या", असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

Full View
Tags:    

Similar News