अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा ट्विटर वर एक मोठी चूक केली आहे. या वेळेला त्यांनी श्रीलंकेत झालेल्य़ा साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आक़डा चुकवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये या बॉम्बस्फोटात 13.8 कोटी लोकांचा मृत्यू झाल्याचे ट्विट केले आहे. श्रीलंकेत रविवारी सकाळी साखळी बॉम्बस्फोट झाले असून या स्फोटात 207 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.. तर 450 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
हा बॉम्बहल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भारतातील राजकीय पक्षांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
भारतीयांसाठी परराष्ट्रमंत्रालयाने हेल्पलाईन सुरू केली आहे. भारत सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. कोलंबोतल्या भारतीय दुतावासाकडून सर्व माहिती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आत्तापर्य़ंत या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Indian High Commission in Colombo @IndiainSL will provide you all help and assistance. Our helpline numbers are :
+94777903082, +94112422788, +94112422789.
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2019
दरम्यान ट्रम्प प्रशासनाच्या ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी हे ट्विट हटवले आहे. मात्र, एवढ्या मोठ्या गंभीर प्रसंगी देखील अशी चूक झाल्यानं जगभरातल्या नेटिझन्सनी डॉनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.