धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीच्या तिकीटावर काँग्रेस नेता

Update: 2020-01-14 05:18 GMT

मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करत परळी मतदारसंघातून विधानसभेवर गेले. त्यानंतर रिक्त झालेल्या बीड विधानपरिषदेची पोटनिवडणूक 24 जानेवारीला होणार आहे. या जागेची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती.

त्यामुळं या जागेवर आता कोणाची वर्णी लागणार अशी चर्चा असताना राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेते संजय दौंड यांना संधी देण्यात आली आहे. ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

हे ही वाचा...

संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र असून पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपने राजन तेली यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध न होता महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होण्याची शक्यता आहे.

Similar News