पडळकर बारामतीतून लढणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

Update: 2019-09-30 08:25 GMT

वंचित आघाडीची साथ सोडून भाजपमध्ये परत आलेल्या गोपीचंद पडळकर यांनी बारामती मधून निवडणूक लढवावी. पडळकर आमचे वाघ आहेत आणि वाघाने बारामतीत उभं राहिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

अजित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना भारतीय जनता पक्षाने आज प्रवेश दिला. पडळकर यांना अजित पवारांच्या विरोधात उभं करून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस समोर नवं आव्हान उभं करू पाहत आहे. बारामती मतदार संघात धनगर समाजाचं प्राबल्य आहे. गोपीचंद यांच्या उमेदवारी मुळे अजित पवारांसमोर तगड आव्हान उभं राहिल असं भाजपाचं मत आहे.

https://youtu.be/P0F5ETxgXXs

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने धनगरांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत त्यामुळे भाजपातर्फे कोणीही उभं राहिलं उद्या मी जरी उभा राहिलो तरी मत देऊ नका तुम्हाला विरोबाची शपथ आहे, असं सांगणारा पडळकर यांचा व्हिडीयो आज व्हायरल झाला आहे. पडळकर यांनी प्रवेशाच्या भाषणात या व्हिडीयोचा उल्लेख करून मी असं म्हटलं होतं, मात्र भाजपाने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या असल्याचं म्हटलं आहे.

Similar News