साखर कारखान्याच्या मुद्द्यावर आज दिल्लीत खलबत, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळ घेणार अमित शहा यांची भेट

Update: 2021-10-19 05:27 GMT

सहकाराच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक, राहुल कुल, पृथ्वीराज देशमुख हे नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय.

या बैठकीसाठी सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व उच्चस्तरीय अधिकारीही उपस्थित राहणार असून सध्या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यातच या कारखान्यांना आयकर विभागाने 10 हजार कोटी रुपयांच्या वसुलीची नोटीस पाठवली आहे. त्यामुळं या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच या बैठकीत दीर्घ मुदतीच्या कर्जाचं पुनर्गठन करावं, निर्यात सबसिडी वाढवण्यात यावी. अशा मागण्या या नेत्यांकडून केंद्राला केल्या जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान दिल्लीत होणाऱ्या या बैठकीकडे राज्यातील सर्वच राजकीय वर्गाचं मोठं लक्ष आहे. कारण राज्यातील सर्व राजकीय नेत्यांचे साखर कारखाने आहेत.

Tags:    

Similar News