देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी: हसन मुश्रीफ

Update: 2020-05-21 10:10 GMT

कोरोनाच्या परिस्थितीला तोंड देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत राज्यपालाकडं सातत्यानं तक्रारी करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली आहे. 'फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी,' असं सणसणीत टोला मुश्रीफ यांनी हाणला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षावर टीका केली. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सातत्यानं राजभवनवर जाऊन राज्यपालांशी चर्चा करत आहेत. तक्रारी करत आहेत. मंगळवारी देखील फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी बैठक बोलावली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी फडणवीसांना चिमटा काढला.

Similar News