पुण्यात अल्पवयीन मुलीच्या हत्येवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संताप

Update: 2021-10-13 02:56 GMT

पुणे  : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना निर्घृण हत्या झाल्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त करत, हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे.असं म्हटले आहे , सोबतच "इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही" अस अजित पवारांनी म्हटले आहे.

पुण्याच्या बिबवेवाडीत कबड्डी खेळताना अल्पवयीन विद्यार्थीनीच्या हत्येची घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे.पुण्यात अल्पवयीन विद्यार्थीनीची निर्घृण हत्या  हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षणमुंबई - पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थीनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या झाल्याची घटना अत्यंत निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरातली कठोर शिक्षा करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील अल्पवयीन कबड्डीपटूच्या हत्येबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.

Tags:    

Similar News