NewsClick च्या केरळमधील माजी पत्रकाराच्या घरी Delhi Police

Update: 2023-10-07 12:07 GMT

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने News Click या न्यूज पोर्टलच्या माजी पत्रकार Anusha Paul ला शुक्रवारी केरळमधील तिच्या पठाणमथिट्टा येथील घरी बोलावले.

न्यूज पोर्टल News Click च्या ऑपरेशन्सच्या तपास करता करता दिल्ली पोलिसांच पथक केरळपर्यंत पोहोचलंय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने न्यूजक्लिकच्या माजी पत्रकार अनुषा पॉलला शुक्रवारी तिच्या पठाणमथिट्टा येथील घरी तिची चौकशी केली.

शनिवारी अनुषा पॉल यांनी पत्रकारांना सांगितले की, दिल्ली पोलिसांच्या या तीन जणांच्या पथकात एका महिला अधिकाऱ्याचा समावेश आहे. जेव्हा ती न्यूज क्लिक या संस्थेसोबत होती तेव्हा NewsClick च्या निधी आणि रिपोर्टिंग असाइनमेंटबद्दल पथकांन विचारले.

पॉल म्हणाल्या की अधिकाऱ्यांनी तिला स्पष्टपणे विचारले की, ती कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) दिल्लीचे राज्य सचिव के.एम. तिवारी यांना ओळखते का ? यावर तिने नाही असं उत्तर दिलं. पोलिसांनी तिचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन देखील घेतला आणि तिला लवकरात लवकर नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात जाण्यास सांगितले.

पॉल म्हणाली की, तिने 2018-22 या कालावधीत NewsClick साठी काम केले आहे आणि सध्या नॅशनल प्लॅटफॉर्म फॉर द राइट्स ऑफ द डिसेबलमध्ये ती संशोधक म्हणून काम करत आहे. बुधवारी केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी न्यूजक्लिकवरील छाप्याला स्वतंत्र वृत्तपत्रांना रोखण्यासाठीचा उपाय असल्याचं म्हटलंय.

Tags:    

Similar News