Cyclone Tauktae live updates: सागरी किनाऱ्यावर तौक्त चक्रीवादळ धडकणार, पोलीस यंत्रणा सज्ज

Update: 2021-05-16 16:59 GMT

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तौक्ते चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. समुद्र किनाऱ्यावरील सीमाभागांमध्ये या वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या वादळामुळे भारतीय किनाऱ्यालागतच्या राज्यांना मोठा तडाखा बसलाय. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी वरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तौक्ते चक्री वादळ संकटाला रायगड जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी वादळ काळात प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. वादळ हे रायगड समुद्रात 17 मेच्या पहाटे येणार असल्याने पोलीस यंत्रणा रात्रभर सज्ज राहणार आहे.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन

रायगड जिल्ह्याला 240 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांना समुद्रकिनारे आहेत. वादळाचा फटका हा समुद्रकिनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना अधिक बसत असतो. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडूनही नागरिकांना आवाहन केले जात आहे.

पोलीस यंत्रणा सज्ज

अलिबाग तालुक्यातील अलिबाग, वतसोली, थळ, आक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, मांडवा याठिकाणी समुद्रकिनारे आहेत. याठिकाणी पोलीस स्वत: जाऊन मच्छीमार बांधवांना वादळ काळात बोटी घेऊन जाऊ नये, याबाबत सूचना देत आहेत. तसेच नागरिकांनी वादळात बाहेर पडू नये, घरातच रहावे, अशा सूचना देखील पोलिसांकडून दिल्या जात आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून वादळात झाडे पडल्यास त्वरित रस्ते मोकळे करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी दिली आहे.

अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांना समुद्रकिनारे आहेत. वादळाचा फटका हा समुद्रकिनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना अधिक बसत असतो. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडूनही नागरिकांना आवाहन केले जात आहे.

Tags:    

Similar News