Covid 19 : बाधीत रुग्णांची संख्या २००० पार, राज्यात ४१६ रुग्ण

Update: 2020-04-02 15:41 GMT

देशात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेली आहे. सध्या देशात एकूण २३८८ कोरोना बाधीत रुग्ण आहे. त्यातील १७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ५० रुग्णांचा कोरोना ने बळी घेतला आहे. तर इकडे राज्यात दिवसेंदिवस कोरोना चा आकडा वाढत आहे.

आज दिवसभरात राज्यात ८१ कोरोना बाधीत रुग्ण आढळले. या ८१ रुग्णांसह राज्यात कोरोना च्या रुग्णांची संख्या ४१६ झाली आहे. तर १९ लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

यामध्ये आज पुण्यात ६, पिंपरी चिंचवडमध्ये ३, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये ९, ठाण्यात ५, बुलढाण्यात १, औरंगाबाद मध्ये २ असे रुग्ण आढळले आहेत. त्यातच महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे धारावी सारख्या झोपडपट्टीत आढळलेला कोरोनाचा रुग्ण तसंच दिल्लीत मर्कज च्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या देशभरातील तबलिगी जमातशी जोडलेले नऊ हजार सदस्य आणि त्यांच्याशी संबंधितांना क्वारंटाइन करण्यात आले आहे -त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे . त्यांच्यामुळे अधिक लोकांना कोरोना ची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कुठं आढळले नवीन रुग्ण?

* मुंबई – 57

* पुणे – 6

* पिंपरी-चिंचवड – 3

* ठाणे – 5

* अहमदनगर – 9

* बुलडाणा – 1

* वसई – 1

* हिंगोली – 1

अलिकडे ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने तात्काळ उपाययोजना म्हणून ग्रामीण भागात विशेष 30 कोरोना रुग्णालय सुरु केले आहेत. या रुग्णालयांत फक्त करोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा करोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण?

मुंबई – 238 पुणे – 44 पिंपरी चिंचवड – 15 सांगली – 25 नागपूर – 16 नवी मुंबई – 13 कल्याण – 10 ठाणे – 8 वसई विरार – 6 पनवेल – 2 उल्हासनगर – 1 अहमदनगर – 17 बुलडाणा – 5 यवतमाळ – 4 सातारा – 2 कोल्हापूर – 2 पालघर- 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 नाशिक – 1 जळगाव- 1 हिंगोली – 1 इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 416

Similar News