CoronaVirus : येत्या 15 दिवसात 41 हजार परदेशी भारतीय मुंबईत दाखल होणार

Update: 2020-03-19 05:39 GMT

कोरोनो व्हायरसचा राज्यातील वाढता प्रभाव लक्षात घेता मुंबई देखील सज्ज झाली आहे. येत्या 15 दिवसात परदेशातून सुमारे 41 हजार परदेशी भारतीय मुंबईत परतणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या 41 हजार परदेशी भारतीयांना विलिगीकरण कक्षात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे येत्या 15 दिवसांमध्ये मुंबई विमानतळावर 26 हजार भारतीय नागरिक आखाती देशातून येणार आहेत. तर 15 हजार भारतीय नागरिक अमेरिकेतून येणार आहेत. या देशातील कोरोनो व्हायरस ग्रस्त लोकांची संख्या लक्षात घेता महानगरपालिकेने या 41 हजार भारतीयांना विलिनीकरण कक्षात ठेवण्यासाठी 7 हिल्स हॉस्पिटल, जे डब्लू मॅरीड हॉटेल, सहार इंन्टरनॅशनल आणि ताज विवांता येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नुकतेच महाराष्ट्रामध्ये दुबई हून आलेले 15 भारतीय नागरिकांना कोरोनो ची लागण झाल्याचं निष्पण्ण झालं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर या नागरिकांकडून भारतामध्ये होणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Similar News