पुण्यात कोरोना लसीचा ड्रायरन सुरु....

Update: 2021-01-02 08:44 GMT

पुणे जिल्हयातील तीन ठिकाणी कोरोना लसीकरण सराव फेरी घेण्यात आली. सकाळी नऊ वाजता पुण्यातील जिल्हा औंध रुग्णालय, पिंपरी-चिंचवड येथील जिजामाता रुग्णालय आणि ग्रामीण भागातील माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही सराव फेरी पार पडली.

पुणे शहर आणि जिल्हयात तीन ठिकाणी प्रत्येकी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना या चाचणीत सहभागी करून घेण्यात आले होते. या ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांची जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच कोरोना लसीकरणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली आहे.

सकाळी नऊ वाजता संबंधित कर्मचाऱ्यांची लसीकरणाआधी आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यानंतर तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपवर नाव नोंदणी केली गेली. चाचणी झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांची मुलाखतही घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेला किती वेळ लागतो, काय-काय अडचणी येऊ शकतात, याबाबतचा आढावादेखील यावेळी घेण्यात आला. तिन्ही केंद्रांत आरोग्य विभागाचे प्रत्येकी पाच अधिकारी उपस्थित होते.


Full View
Tags:    

Similar News