कोरोना इफेक्ट | औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

Update: 2020-03-11 07:44 GMT

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र या निवडणुकीवरही आता कोरोना व्हायरसचं सावट आल्याचं दिसतंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांची केली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. ती आणखी वाढण्याती शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी आणि महापालिकेला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.

या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि महापालिकेला मुदतवाढ दिली तर कोरोनासारख्या आजाराचा सामना करता येईल आणि ६ महिन्यानंतर सदृढ वातावरणात निवडणुकांना सामोरे जाता येईल असं महापौर म्हणाले आहेत.

Similar News