कल्याणच्या गुजराथी कुंभारवाड्यात यावर्षी ही कोरोनाची सावट

Update: 2021-09-29 07:40 GMT

कल्याण  :नवरात्री उत्सव काही दिवसांवर आला असून नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविक विशेषतः महिलावर्ग मोठ्या भक्तीभावाने आदिमातेची पूजा करत असतात. त्यासाठी देवीचा साज म्हणून घरो घरी घटस्थापना करतात या घटस्थापनेसाठी विशेषता गुजराती पध्दतीची रंगवलेली मडकी याची सर्वात जास्त मागणी होत असते, त्यामुळे कल्याण मधील गुजराथी कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कल्याण येथील कुंभारवाड्यात मडके म्हणजे गरबा बनवण्याचे काम महिलावर्ग एक महिना अगोदरच करायला सुरुवात करतात.

ठाणे ,पुणे ,पालघर ,मुंबई अशा विविध ठिकाणावरून या रंगवलेल्या मडक्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. मात्र, कोरोनाचे सावट असल्यामुळे गेल्यावर्षी गुजराथी कुंभाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यावर्षी काही प्रमाणात निर्बंध उठवले असले तरी अद्यापही कोणत्याच प्रकारची मागणी येत नसल्याने यावर्षीही या कुंभारांना आर्थिक संकट व साहित्य नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र शासनाने मंदिरे खुले करणार असल्याचे सांगितल्यावर आता तरी ग्राहक येतील का? असे विचार करत यांचे डोळे ग्राहकांकडे लागले आहे.

Tags:    

Similar News