लोचा झाला रे ! एकाच मतदारसंघात भाजप अन् सेनेचाही उमेदवार

Update: 2019-10-01 12:07 GMT

भाजपने आज विधानसभा निवडणुकांसाठीची पहिली यादी जाहीर केली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अरूण सिंह यांनी भाजपचे १२५ उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये १२ महिला असून ५२ जणांना पुन्हा संधी देण्यात आलीय. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

शिवसेना आणि भाजपची युती झालेली असताना देखील आज भाजपने जाहीर केलेल्या यादीत इचल करंजी येथून भाजपने उमेदवार दिला आहे. यादीतील 121 क्रमांकावर सुरेश हळवणकर यांचं मतदारसंघ क्रमांक 279 मध्ये नाव देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने या पुर्वीच या ठिकाणाहून हातगणंगलेचे आमदार सुचित मिनचेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं इचलकरंजी मतदारसंघात नक्की उमेदवारी कोणाला मिळणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या आमदार सुचित मिनचेकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेने ही जागा स्वत:कडं ठेवली आहे. मात्र, भाजपने या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर केल्यानं शिवसेना भाजप युतीत इचलकरंजी च्या जागेवरुन लोचा निर्माण झाला आहे.

Similar News