जुनी सांगवी परिसरातील रखडलेली विकासकामे पूर्ण करा- राजेश पाटील

Update: 2021-09-15 13:29 GMT

जुनी सांगवी परिसरातील विकासकामे, रस्ता रुंदीची कामे तसेच अतिक्रमणाबाबत अपूर्ण राहिलेली कामे त्वरीत पूर्ण करावीत असे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. जुनी सांगवी परिसरातील सुरू असलेली तसेच प्रस्तावीत विकास कामांची महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या समवेत आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी केली. त्यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत.

यावेळी ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे, सहशहर अभियंता अशोक भालकर आदी उपस्थित होते.

आयुक्त राजेश पाटील यांनी प्रस्तावित मधूबन सोसायटी १२ मीटर डी.पी.रस्ता, मुळा रोड १८ मीटर रस्ता, खेळाचे मैदान, सांस्कृतीक केंद्र, सांगवी बोपोडी पुल, पी.डब्ल्यु.डी. मैदानाशेजारील रस्त्यालगत झालेले अतिक्रमण आणि विकासकामाबाबत अधिकाऱ्यांसह पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला तसेच परिसरातील नागरी समस्यांबाबत माहिती घेतली.

महापौर माई ढोरे, ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे यांनी वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, अतिक्रमण समस्या आयुक्त पाटील यांना सांगितल्या.

Tags:    

Similar News