मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन लोकप्रियता घटली?

Update: 2019-11-07 07:40 GMT

24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला. जनतेने कोणत्याही पक्षाला स्पष्ट कौल दिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च मुख्यमंत्री होतील. अशी शक्यता निवडणुकीच्या अगोदर व्यक्त केली जात होती. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असल्याचं दिसून येतं. जर मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाईन लोकप्रियतेचा विचार केला तर मुख्यमंत्री देवंद्रे फडणवीस यांनी निकाल लागल्यापासून साधारण 60 फेसबुक पोस्ट केल्या आहेत. तर ट्विट्र वर 116 पोस्ट केल्या आहेत.

24 ऑक्टोबरला निकाल लागल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्याचं फेसबुक कमेंटमधून पाहायला मिळतं. मात्र, त्यानंतर या कमेंन्टचा ओघ घसरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात कशा पद्धतीनं राजकारण केलं? याचा आरसा राज्यातील जनतेनं कमेंटच्या रुपातून मुख्यमंत्र्यांना दाखवला असल्याचं दिसून येतं.

यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाबाबत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच ऑनलाईन अर्ज करुनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर तिखट प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत.

या कमेंन्टमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपमधील काही नेत्याचं राजकीय करीअर कशा पद्धतीने संपवले? आणि या नेत्यांचं पक्षातील महत्त्व कसं कमी केलं? यावर देखील नेटीझन्संनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टचा आम्ही आढावा घेतला नक्की पाहा मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन लोकप्रियता घटली आहे का?

Full View

Similar News