मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी पुन्हा संवाद साधणार, काय बोलणार मुख्यमंत्री?

Update: 2021-04-30 08:09 GMT

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्र दिनाच्या पुर्वसंध्येला जनतेशी संवाद साधणार आहेत. आज संध्याकाळी (30 मे 2021) ला ते फेसबूक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधतील. लॉकडाऊन वाढवल्यानंतर ते पहिल्यांदाच राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत.

केंद्रसरकारने 1 मे पासून देशात 18 वर्षापुढील लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या राज्यांना पुरेसा लसींचा साठा मिळालेला नसताना 18 वर्षापुढील लोकांना लसीकरण कसं करायचं असा सवाल राज्यांसमोर आहे. त्यातच लॉकडाऊन पॅकेजची जाहीर केलेली रक्कम लोकांना मिळालेली नसताना आता लॉकडाऊन वाढवल्यानं लोकांना वाढीव मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री काही निर्णय घेतात का? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.

Tags:    

Similar News