VIDEO : मुख्यमंत्र्यांची उमेदवारी धोक्यात

Update: 2019-10-05 10:15 GMT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रावर शिक्का मारणाऱ्या नोटरीची टर्म संपल्याचं लक्षात आल्यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या मागणीवर निवडणूक निर्णय अधिकारी आज आपला निर्णय कळवणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथपत्रासाठी जे मुद्रांक विकत घेतलं होतं ते ३ तारखेला विकत घेण्यात आले होते. शपथपत्राची दस्तनोंदणी करणाऱ्या नोटरीचा शिक्का ही या शपथपत्रावर आहे. मात्र या शिक्क्यामध्ये असलेली नोटरी यांचा कार्यकाल संपण्याची तारिख २०१८ ची आहे.

मुदत संपलेल्या नोटरीने या अर्जावर शिक्का मारलेला असल्याने हे दस्त नियमबाह्य ठरतं असा आरोप नागपूर जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंगलकर यांनी केला आहे.

Full View

Similar News