CBSE च्या १० आणि १२वीच्या परीक्षा होणार

Update: 2020-04-30 02:35 GMT

CBSE च्या १० आणि १२ वीच्या परीक्षांबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पण आता CBSE ने यावर सष्टीकरण दिले आहे. CBSE ने ट्विट करुन माहिती दिली आहे की १० आणि १२ वीच्या परीक्षांबाबत बोर्डातर्फे १ एप्रिल रोजी जे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले होते, तेच कायम आहे.

तसंच लॉकडाऊन पूर्णपणे संपल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन परीक्षा घेतल्या जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे. पण विद्यार्थ्यांनी घाबरु नये, कारण परीक्षेच्या १० दिवस आधी विद्यार्थ्यांना तारखा सांगितल्या जाणार आहेत असंही सीबीएसईने स्पष्ट केले आहे. CBSEच्या १० आणि १२वीच्या परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात यावे अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी केली होती.

Similar News