चार्टर्ड बाईक्समुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल

Update: 2021-11-13 04:02 GMT

मुंबई : पवईच्या हिरानंदानी गार्डन परिसरात सुरु झालेल्या चार्टर्ड बाईक्सच्या विजेवर चालणाऱ्या दुचाकींना अदाणी इलेक्ट्रिसिटीतर्फे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या दुचाकी मुख्यतः इ कॉमर्स कंपन्यांतर्फे किंवा खाद्यान्न डिलीव्हरीसाठी वापरल्या जातात. त्यांचा जास्तीत जास्त वेग 25 किलोमीटर प्रति तासापर्यंतच असल्याने त्या चालविण्यासाठी चालक परवाण्याची आवश्यकता

सध्या 50 ई-बाईक्स पवईत सुरु करण्यात आल्या आहेत. हिरानंदानी गार्डन्समधील टोरिनो टॉवरजवळ या दुचाकी असणार आहेत. या बाईकमुळे रहिवाशांना प्रदूषणमुक्त वाहनांचा अनुभव मिळणार आहे. शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या बाईकचा फायदा होईल. तसेच शहरातील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण कमी होईल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबईचे प्रवक्ते म्हणाले.

तसेच ही विद्युत वाहने वापरण्याच्या रोजच्या खर्चात प्रत्येकी दीडशे ते दोनशे रुपयांची बचत होणार आहे. असा प्रकल्प सर्वांनाच लाभदायक असल्यामुळे इतर शहरांनी याचे अनुकरण करावे, असे चार्टर्ड बाईक्सचे प्रवक्त संयम गांधी म्हणाले.

Tags:    

Similar News