चंद्रकांत पाटलांचं निवडणुकांसंदर्भात भाकीत

Update: 2019-06-26 04:05 GMT

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता १५ सप्टेंबरपासून लागू होईल. तर १५ ते २० ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका होतील, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहर भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या महिन्याभरात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार आहेत. त्यामळे युतीच्या विधानसभेत २२० जागा निवडून येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. तसेच अब की बार, २२० पार या घोषणेचा पुनरूच्चार यांनी केला.

यावेळी पाटील यांनी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत २२८ मतदारसंघात युतीच्या उमेदवारांना मताधिक्‍य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांपैकी २२० जागा जिंकण्याचे लक्ष्य युतीने ठेवले आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे.

Similar News