परमबीर सिंह- सचिन वाझे भेट, आयोगाने पोलिसांना फटकारले

Update: 2021-11-30 08:21 GMT

अँटालिया प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिना वाझे आणि परमबीर सिंह यांच्या सोमवारी झालेल्या भेटीमुळे आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे. चांदिवाल आयोगापुढे चौकशीसाठी हजर करण्यात आलेल्या सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांची जवळपास तासभर चर्चा सुरू होती. अशाप्रकारे दोन आरोपींना चर्चा करता येत नाही, असा नियम असताना ही चर्चा झालीच कशी असा सवाल चांदिवाल आयोगाने उपस्थित केला आहे. आयोगाने वाझे आणि परमबीर सिंह यांच्या भेटीवरून सचिन वाझेच्या वकिलांसमोर नाराजी व्यक्त केली. या कोर्टाच्या बाहेर जे काही घडेल त्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान चांदिवाल आयोगापुढे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील मंगळवारी हजर झाले. तसेच सचिन वाझे आणि परमबीर सिंग देखील दुसऱ्या दिवशी आयोगापुढे हजर होते. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सचिन वाझे याला काही प्रश्न विचारण्याची परवानगी आयोगाकडे मागितली. तसेच स्वत: अनिल देशमुख यांनीही आयोगाकडे विनंती केली. या दरम्यान सचिन वाझेने अनिल देशमुख यांच्याशी कोर्ट रुममध्ये बोलण्याचा प्रयत्न करताच आयोगांने फटकारले. आपल्या चांगलेपणाचा फायदा उठवू नका असे आयोगाने वाजेला फटकारले.

दरम्यान परमबीर सिंह- सचिन वाझे यांच्या सोमवारी झालेल्या भेटीबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Tags:    

Similar News