#कोरोनाशी_लढा- गुजरात, महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाहणी करणार

Update: 2020-06-26 01:34 GMT

देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पाहणी करत आहे. दरम्यान महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये पुन्हा एकदा केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे.

संक्रमण रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहिती या पथकातर्फे घेतली जाणार आहे. चार दिवसांच्या दौर्‍यामध्ये हे पथक राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.

हे ही वाचा..

लोकल कधी सुरू होणार? रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय

सोमवारपासून सलून उघडणार, असे असतील नियम

राज्यातील मृत्यूदर ४.६९…, कोरोनाचं संकट कधी थांबणार?

महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर गुजरातमध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता या राज्यांमध्ये लक्ष घातलेले आहे. दरम्यान देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दररोज कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झालेली आहे आणि रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता 57 टक्क्यांच्या पुढे गेलेले आहे.

Similar News