केंद्र सरकारने देवस्थानांमध्ये पडून असलेलं सर्व सोनं ताब्यात घ्यावं - पृथ्वीराज चव्हाण

Update: 2020-05-13 13:52 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी २० लाख कोटींच्या आत्मनिर्भर विशेष पॅकेजची घोषणा केली. यासंदर्भात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मागणी केली होती.

आता अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक उपाय सुचवला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावं अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (म्हणजे सुमारे ७६ लाख कोटी रुपये) किंमतीचे इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावं असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

Similar News