झारखंडमध्ये न्यायाधीशांची भर दिवसा, भर रस्त्यात हत्या

Update: 2021-07-29 10:16 GMT

झारखंडच्या धनबादचे जिल्हा व सत्र न्यायलयाचे न्यायमुर्ती उत्तम आनंद यांच्या मृत्यूबाबत आधी हिट अँड रन ची चर्चा झाली होती. मात्र, आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. मॉर्निंग वॉक करत असताना अपघात होऊन त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर रिक्षाचालक त्यांनी मुद्दाहून धडक देताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे.

दरम्यान यानंतर झारखंड बार कांउसिलचे सदस्य हेमंत सिकरवार यांनी न्यायमुर्ती उत्तम आनंद यांची हत्याच झाल्याचे म्हटलं आहे. झारखंड येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची हत्या घडवून आणल्याचे सिकरवार यांनी म्हटलं आहे.सोबतच या संपुर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.तर दुसरीकडे साहिबगंजचे प्रधान जिल्हा सह न्यायिक सेवा संघाचे प्रभारी सचिव बंशीधर तिवारी यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

रिक्षा चालकाने दिली होती धडक

साहिबगंजचे प्रधान जिल्हा सह न्यायिक सेवा संघाचे प्रभारी सचिव बंशीधर तिवारी यांनी सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. न्यायमुर्ती उत्तम आनंद हे रस्त्याच्या एकदम कडेने जात असताना संबधित रिक्षा चालकाने जाणून- बुजून त्यांना धडक दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे दिसत असल्याने या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी बंशीधर यांनी केली आहे.

Tags:    

Similar News