Video: नशिब बलवत्तर! डोक्यावर झाड पडताना महिला पळाली आणि...

Update: 2021-05-18 11:56 GMT

मुंबईत माणूस घराच्या बाहेर पडला की, तो जीवंत परत येईल याची अजिबात शाश्वती नसते. कधी तो रस्त्यात उघड्या असणाऱ्या मॅनहोलमध्ये पडतो तर कधी रस्त्यावरील खड्यांमुळे झालेल्या अपघातांचा शिकार होतो. ट्रेनला लटकवून ऑफिसला जाताना हात निसटला तर... आयुष्यातून निसटतो. एकंदरींत मुंबईत माणसाचा काहीच भरवसा नाही. रस्त्यावरुन चालताना झाडाची फांदी कधी डोक्यावर पडेल सांगता येत नाही. असाच प्रसंग मुंबईत घडला आहे.

मुंबईत 17 मेला अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 'तौत्के' वादळ निर्माण झाले होते. या वादळामुळे अनेक ठिकाणची झाडं कोसळली. या वादळादरम्यान एक महिला झाडा खालून रस्ता क्रॉस करत होती. मात्र, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही महिला डोक्यावर छत्री घेऊन रस्ता ओलांडत असताना अचानक झाडांची फांदी तुटली. त्या दरम्यान या महिलेने ताबडतोब पळत रस्ता ओलांडला... आणि ती वाचली... पाहा ही दृश्य विवेक गुप्ता नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

Tags:    

Similar News