बंदी असतानाही ११वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा, पोलिसांची कॉलेजवर कारवाई

Update: 2020-06-13 01:46 GMT

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पणे असे असले तरी ११ वीच्या विद्यार्थ्यांना बोलावून परीक्षा देण्यास भाग पाडल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथं घडला आहे.

११वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेतली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्नेहवर्धन शैक्षणिक ट्रस्टच्या शाळेत पोलिस पोहोचले तेव्हा २७ विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे दिसले. या प्रकरणी ट्रस्टच्या १४ सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शिक्षकांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा..

अँब्युलन्स चालकाचा आगळा वेगळा वाढदिवस

बापरे बाप!

जातीव्यवस्था : मजबूत होतीय की खिळखिळी? प्रा. हरी नरके

११ कॉमर्सच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची स्नेहवर्धन ज्युनियर सायन्स आणि कॉमर्स कॉलेजमध्ये परीक्षा घेतली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा ३ वेगवेगळ्या वर्गांमध्ये २७ मुलांची परीक्षा घेतली जात होती. पण सरकारने या सर्व गोष्टींना बंदी घातल्याने ही कारवाई केल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी म्हटले आहे.

Similar News