भांडवलशाही देशासाठी घातक की जनकेंद्री अर्थव्यवस्था: संजीव चांदोरकर

Update: 2020-09-07 05:33 GMT

खाजगी कॉर्पोरेट, मक्तेदार भांडवलशाही देशासाठी घातक की जनकेंद्री अर्थव्यवस्था ९० टक्के नागरिकांच्या हिताची आहे. याच्या चर्चा “तटस्थ” पणे ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या नागरिक भावा बहिणीसाठी एकच प्रश्न विचारायला हवा. हे सारखे जनकेंद्री / समाजवादी म्हणणाऱ्या लोकांना ते म्हणण्यासाठी कोणी पैसे देत असेल का?

आणि आता विरुद्ध प्रश्न विचारा

अंबानीच्या रिलायन्स मध्ये अधिकारी म्हणून काम करणाऱ्याने खाजगी भांडवलदार, मोठ्या कंपन्या, देशासाठी किती भरीव कार्य करीत आहेत. म्हणून भाषणे दिली , कंपनीच्या कामगारांमध्ये अंबानींची प्रतिमा उंचावली. तर त्याला प्रमोशन मिळण्याचे चान्सेस वाढतील की नाही?

दुसरा एखाद्या सार्वजनिक मालकीच्या उपक्रमांत अधिकारी आहे. आणि सार्वजनिक क्षेत्राची भारतासारख्या गरीब देशाला किती गरज आहे. म्हणून मांडणी केली तर एकही एजन्सी वा व्यक्ती नाही. जी त्याला मांडणीसाठी मोबदला देईल.

अजून प्रश्न विचारा

खाजगी भांडवलाची तरफदारी करणारे, मक्तेदारी मध्ये काहीच वाईट नाही. अशी मांडणी करणारे नावाजलेले अर्थतज्ञ मोठ्या कंपन्यांनी स्थापन केलेल्या थिंकटॅंक्स मध्ये लाखो रुपयांच्या पगारावर नेमले तरी जातील. समाजवादी, जनकेंद्री अर्थव्यवस्थेची मांडणी / गरज मांडणाऱ्या अर्थतज्ञांना तशी मांडणी करण्यासाठी कोणी तरी पैसे देत असेल काय ?

करा विचार!

Similar News