केंद्रीय मंत्रिमंडळाची 22 वा विधी आयोग गठन करण्यास मंजूरी

Update: 2020-02-19 11:17 GMT

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 22 व्या विधी आयोगाचं गठन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

हा आयोग सरकारला कायदेशीर बाबतीत सल्ले देण्याचं काम करेल. 21 व्या विधी आयोगाचा कार्यकाल येत्या ऑगस्ट महिन्यात संपत आहे. म्हणून आज केंद्रीय मंत्रीमंडळाच्या झालेल्य़ा बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. हा आयोग पुढील तीन वर्ष केंद्र सरकारला कायदेशीर बाबतीत सल्ला देण्याचं काम करणार आहे.

केंद्रीय विधी मंत्रालय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या मंजूरी नंतर या संदर्भात एक जीआर काढणार आहे. त्यानंतर विधी आयोगाचं गठन केलं जाईल.

Similar News