CAA : पोलिस अधिकारीच आंदोलकांना म्हणतात, पाकिस्तानात जा!

Update: 2019-12-28 05:05 GMT

सध्या उत्तर प्रदेशचे पोलिस अधिक्षक अखिलेश नारायण सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करणाऱ्या लोकांना पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देत आहेत. हा व्हिडीओ 20 डिसेंबरचा आहे. याच दिवशी उत्तरप्रदेश मध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं.

व्हिडीओ मध्ये एसपी काळी पट्टी बांधून निषेध करणाऱ्या लोकांना उद्देशून म्हणत आहे की,

काळी पट्टी बांधणाऱ्यांना सांगा की त्यांनी पाकिस्तान निघून जावं, हे बोलत असताना पोलिस अधिकाऱ्यांनी अपशब्दांचा वापर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी स्पष्टपणे धमकी देत असल्याचं दिसून येत आहे.ते या व्हिडीओमध्ये ते हिंदीत म्हणतात की,

हे ही वाचा...

भारतीय अर्थव्यवस्था ढासळत आहे का? काय आहे सत्य?

खेळता-खेळता शिका व शिकता-शिकता खेळा जळगावच्या अनुभूती स्कुलचा अभिनव उपक्रम…

पोलिस नको, बंदुक परवाने द्या- लक्ष्मण पवार

''जो काली पट्टी और पीली पट्टी बांध रहे हो बता रहा हूं... उनसे कह दो पाकिस्तान चले जाएं. फ़्यूचर काला होने में लगेगा सेकेंड भर, एक सेकेंड में सब काला हो जाएगा. देश में नहीं रहने का मन है, चले जाओ भैया. खाओगे यहां, गाओगे कहीं और का. बताओ #####.. नहीं-नहीं फ़ोटो ले लिया हूं, बताऊंगा इनको. इनको बता देना#####.. इस गली को मैं... गली मुझे याद हो गई है, याद रखना मुझे याद हो जाता है तो नानी तक मैं पहुंचता हूं. याद रखिएगा आप लोग.. ###तुम लोग भी क़ीमत चुकाओगे.''

असं म्हणत एक प्रकारे आंदोलकांना धमकी दिली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी या व्हिडीओमध्ये असंवैधानिक शब्दाचा वापर केला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?

Similar News