बजेट २०२०- नवी कररचना म्हणजे करसवलतींवर करवत?

Update: 2020-02-01 07:51 GMT

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमधून मध्यमवर्गाला करदिलासा दिला असला तरी आता नवीन कर हे काही अटींवरच कमी होणार असल्याचं उघड झालंय. त्यामुळे नवीन करांचा लाभ उठवायचा असेल तर करदात्यांना काही बाबींवर मिळणाऱ्या करसवलतींवर पाणी सोडावे लागणार आहे. निर्मला सीतारामन यांनी करदिलासा देताना ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल अशी घोषणा करत त्यापुढे ५ ते ७.५० लाखांपर्यंतं २० ऐवजी १० टक्के सूट, ७.५० ते १० लाखांपर्यंत १५ टक्के सूट, १० ते १२.५० लाखांपर्यंत उत्पन्न असल्यास २० टक्के सूट दिली जाणार असल्याचं सांगितलंय. पण बजेट मांडल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी सरकारनं कररचना सुटसुटीत करण्यासाठी १०० पैकी ७० करसवलती कमी केल्याचं सांगितलंय. त्यामुळे आता कररचनेचे दोन टप्पे झालेत. यात पहिल्या टप्प्यात आधीची करप्रणाली कायम असेल. तर करकपात केलेली करप्रणाली निवडली तर करदात्यांना काही करसवलतींवर पाणी सोडावे लागणार आहे. पण या सोडाव्या लागणाऱ्या ७० करसवलती कोणत्या याची माहिती आज अर्थमंत्र्यांनी दिलेली नाही.

5 लाख ते 7.5 लाख उत्पन्नावर 20 ऐवजी 10 टक्के कर भरावा लागेल. तर 7.5 लाख ते 10 लाखांपर्यंत्या उत्पन्नावर 20 ऐवजी 15 टक्के कर भरावा लागणार आहे.

10 लाख ते 12.50 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर लागू असेल. तर वार्षिक उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त असणाऱ्यांसाठी करकपात न करता 30 टक्के कर कायम ठेवण्यात आलाय.

Similar News