ब्रायन लारा मुंबईच्या रुग्णालयात

Update: 2019-06-25 10:58 GMT

छातीत दुखू लागल्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याला मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णलयात हलवण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत आला आहे.

नव्वदच्या दशकात वेस्ट इंडिजचा शैलीदार डावखुरा फलंदाज म्हूणन लाराने क्रिकेट जगतात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ब्रायन लारा आता ५० वर्षांचा असून गेली अनेक वर्षे तो क्रिकेटमध्ये फारसा सक्रीय नाही. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये लाराने १३१ कसोटीत ११ हजार ९५३ धावा केल्या आहेत. यातील नाबाद ४०० धावा त्याची सर्वोत्तम खेळी आहे. २९९ एकदिवसीय सामन्यांत लाराने १ हजार ४०५ धावा कुटल्या आहेत. कसोटीमध्ये ३४ शतके ४८ अर्धशतके तर एकदिवसीयमध्ये १९ शतके आणि ६३ अर्धशतके लाराच्या नावावर आहेत.

Similar News