`गोदी` मिडीया विरोधात बॉलिवुड एकवटले

Update: 2020-10-12 17:01 GMT

कोरोना काळात सातत्यानं सुशांतसिह हत्येचा आरोप करुन ड्रगमाफीयाच्या नावे बॉलिवुडला हिनवणार गोदी मिडीया आता पुन्हा एकदा गोत्यात सापडला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात 34 बॉलिवूड निर्माते आणि प्रॉडक्शन कंपन्यांनी रिपब्लिक टीव्ही आणि गोस्वामी, टाईम्स नाऊसह बदनामी करणाऱ्या प्रसारमाध्यमाविरोधात कारवाईसाठी याचिका दाखल केली आहे.

विशेष म्हणजे याचिकाकर्त्यामधे अभिनेता आमिर खानची प्रॉडक्शन कंपनी आणि शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंटचा समावेश आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील चार आघाडीच्या संघटना आणि 34 निर्मात्यांनी रिपब्लिक टीव्ही, अर्नब गोस्वामी, टाइम्स नाऊ आणि इतरांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. यामधे रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, टाईम्स नाऊ, राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांच्याविरूद्ध खटला

दाखल केला आहे. बॉलिवूडविरोधात बेजबाबदार, अपमानास्पद आणि बदनामी करणार्‍या टीव्ही वाहिन्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या खटल्यात बॉलीवूड सेलिब्रिटींच्या "मीडिया ट्रायल" घेण्यापासून वृत्त वाहिन्यांना रोखावे अशी मागणी आहे. टाईम्स नाऊ आणि रिपब्लिक टीव्ही या दोघांनीही बॉलिवूडमधील "ड्रग माफिया" विषयीच्या बातम्या चर्चा केल्याने हा खटला उभा राहीला आहे. कोर्टात गेलेल्यांमध्ये आमिर खान प्रॉडक्शन, अजय देवगन चित्रपट, धर्म प्रॉडक्शन, रोहित शेट्टी प्रॉडक्शन, शाहरुख खानची रेड चिली यांचा समावेश आहेत.

सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणी बॉलिवूडने त्याची हत्या केल्याचा वारंवार दावा करण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांनी सेलिब्रिटींमध्ये कथित व्हॉट्सअॅप चॅट्स नियमितपणे ड्रग घेत असल्याचा आरोप केला होता. आपल्या देशात बॉलिवूडक उद्योग जो दररोज 5 लाख लोकांना थेट रोजगार आणि 5 दशलक्ष लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्रदान करतो. अशा वेळी जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असताना सोशल मीडिया

"जीस थाली में खातें हैं, उस में छे करते हैं हैं, असं जया बच्चन यांनी लोकसभेत भाजपचे खासदार रवी किशन यांच्या भाषणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. एकंदरीत आता अनेक आरोपामुळे गोदी मिडीया अडचणीत आला असून समाजभिमुख प्रत्रकारीतेची मागणी समाजातील जागरुक घटकांकडून केली जात आहे.



Full View
Tags:    

Similar News