मुंबईतील दारुची दुकानं बंद होणार

Update: 2020-05-06 00:55 GMT

लॉकडाऊनमुळे झालेले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी राज्य सरकारने दारुची दुकानं सुरू करण्यास परवानगी दिली. पण पहिल्याच दिवशी दारुच्या दुकानांसमोर लोकांच्या रांगा लागल्या आणि त्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे दिसून आले.

यानंतर देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या मुंबईत आता दारुची दुकानं बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी दिले आहेत. सर्व असिस्टंट कमिशनर अशी अनावश्यक दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकाच मॉल आणि मार्केट सोडून रहिवासी भागांमधील एकाच रांगेतील ५ दुकानं मग त्यात दारुची दुकानं असतील तर तीसुद्धा सुरू करण्यास सरकारनं परवानगी दिली होती. पण मुंबईसारख्या रेड झोन असलेल्या भागातीही अनेकांना सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले नसल्याचे दिसले. त्यात मुंबईत रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अखेर महापालिकेने दारुची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

Similar News