भाजपच्या माजी खासदारांचं कोरोनामुळे निधन!

Update: 2020-06-16 10:32 GMT

भाजपचे रावेरचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले आहे. मंगळवारी दुपारी 12:30 वाजता त्यांचे निधन झाले. हरिभाऊ जावळे ह्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना मुंबई इथे उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.

हरिभाऊ जावळे ह्यांच जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील भालोद हे मुळगाव . राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मुशीत वाढलेल्या हरीभाऊ यांनी जनसंघापासून राजकारणाला सुरुवात केली. भाजपतर्फे दोनवेळा रावेर लोकसभा मतदार संघातून खासदार तसंच रावेर यावल विधानसभा मतदार संघातून दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. भापच्या सर्व गटांना बरोबर घेऊन चालणारे असल्याने सध्या जळगाव जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदाची जबादारी त्यांच्याकडे होती.

Similar News