भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास, चंद्रकांत पाटलांचा अजब दावा

Update: 2022-04-20 11:47 GMT

पुण्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Devendra fadanvis) देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) उपस्थित होते.यावेळी केलेल्या भाषणामध्ये चंद्रकांत पाटील यांनी भाजपा ही काही १९५१ साली स्थापन झालेल्या पक्ष नसून त्याला पाच हजार वर्षाचा इतिहास असल्याचं हिंदुत्वाचा संदर्भ देत असा दावा केला आहे.

यावेळी पाटील यांनी अप्रत्यक्षपणे(Shivsena) शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला."भाजपाबद्दल किती अज्ञान असावं. या पक्षाला पाच हजार वर्षाच्या हिंदुत्वाचा इतिहास आहे. हा विषय अज्ञानाचा असू शकतो. पण हा पक्ष ८० साली स्थापन झाला असे समजणारे खूप महाभाग आहेत ज्यांना टीव्हीवर रोज कव्हरेज मिळते. अशा लोकांना पक्ष ८० साली स्थापन झाला. ८० ला पक्ष स्थापन झाल्यानंतर त्याला आम्ही गावोगावी नेलं असं काहींना वाटतं. १९८८ ला त्यांचा पहिला आमदार झाला. त्या आमदाराची पार्श्वभूमी इथे मांडणं बरोबर नाहीय. मी त्या भागातला जिथं पहिला आमदार झाला," असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना अप्रत्यक्षपणे लगावला. यापूर्वी अनेकदा राऊत यांनी शिवसेनेसोबत असल्याने भाजपा महाराष्ट्रामधील अनेक भागांमध्ये पोहचल्याचं वक्तव्य केलं आहे.

भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास, चंद्रकांत पाटलांचा अजब दावाअसा टोला पाटील यांनी लगावला.

या पार्टीला (भाजपाला) मोठा वसा आहे, या पार्टीला हात लावता येणार नाही हे माहिती आहे. अशावेळी ह ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्वाचं आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे. आम्ही केवळ १९५१ साली स्थापन झालेलो नाही आहोत. आम्ही केवळ १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेऊन स्थापन झालेले नाही आहोत. आमची परंपरा पाच हजार वर्षांची आहे, असं पाटील यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News