कोरोना मदत : भाजपचं आता श्रीराम धान्य किट

Update: 2020-04-07 15:25 GMT

कोरोना लॉक़ाऊनमुळे अनेक गरीबांना रोजीरोटीचं साधन उरलेलं नाही. संचारबंदी असल्याने अनेकांना कामावर जाता येत नाही, त्यामुळे अनेकांच्या घरातले पैसे ही संपले आहेत. अशावेळी विविध राजकीय पक्षांनी गरजूंना मदत वाटप करण्यास सुरूवात केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी या मदतीला श्री राम धान्य प्रसाद असं नाव दिलं आहे. रामनवमीच्या निमित्ताने सुधीर मुनगुंटीवार यांनी मुल शहरातील गरजूंना 10 हजार श्रीराम धान्य प्रसादाच्या किटस् चे वितरण करण्यात येत आहे.

Similar News