भाजपने आखली आगामी निवडणूकांसाठीची रणनिती, 12 नेते महाराष्ट्र पिंजून काढणार

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. या संघर्षादरम्यान भाजपने आगामी काळातील राज्यातील निवडणूका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बारा नेत्यांना मैदानात उतरवले आहे.

Update: 2022-04-01 02:35 GMT

गेल्या काही दिवसात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तीव्र झाला आहे. तर नगरपंचायत निवडणूकांमध्ये भाजपच एक नंबरचा पक्ष ठरला असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर आगामी काळात येणाऱ्या महापालिका, जिल्हापरिषद, पंचायचत समित्यांच्या निवडणूकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने राज्यातील महत्वाच्या बारा नेत्यांवर निवडणूकीची जबाबदारी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपने पुढील काळातील निवडणूकांबाबत चर्चा केली. त्यामध्ये राज्यात संघटनात्मक बांधणीसह, सदस्य नोंदणी आणि विविध विषयांवर सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे बारा नेते राज्यभर दौरा काढणार आहेत. तर त्यासाठी नेत्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रत्येक नेत्याला विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे.

त्यामुळे 15 एप्रिल पासून भाजप राज्यभर दौरा काढणार आहे. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भाजप पोलखोल अभियान राबवणार आहे. या अभियानाची जबाबदारीही या 12 नेत्यांवर देण्यात आली आहे. त्यापैकी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अहमदनगर आणि सोलापुर, पंकजा मुंडे यांच्याकडे कोल्हापुर आणि सांगली, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अकोला आणि अमरावती, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड आणि जालना तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बुलढाणा आणि नंदुरबार या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

कोणत्या नेत्यावर कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी

  • देवेंद्र फडणवीस – अहमदनगर, सोलापूर
  • सुधीर मुनगंटीवार- बीड, जालना
  • चंद्रकांत पाटील- ठाणे ग्रामिण, नाशिक
  • रावसाहेब दानवे- नंदुरबार, बुलढाणा
  • पंकजा मुंडे- कोल्हापुर, सांगली
  • आशिष शेलार- रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • प्रविण दरेकर- पालघर, मीरा भाईंदर
  • चंद्रशेखर बावनकुळे- अकोला, अमरावती
  • गिरीश महाजन- हिंगोली, उस्मानाबाद
  • रवींद्र चव्हाण- सातारा, पुणे ग्रामिण
  • संभाजी पाटील निलंगेकर- भंडारा, गोंदिया
  • संजय कुटे- दक्षिण रायगड, उत्तर रायगड
Tags:    

Similar News