मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप

Update: 2020-12-19 12:00 GMT

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर काँग्रेसने मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड केली आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत या नावांना मंजुरी देण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीच्य दृष्टीने काँग्रेसने मराठी चेहरा दिला आहे.

Tags:    

Similar News