सावधान ! मुंबईत आढळला झिकाचा रूगण, पण खबरदारी घ्यायची कशी?

Update: 2023-08-24 09:18 GMT

मुंबईत झिकाचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर गेले आहे. त्यामुळे झिकाची लक्षणं काय असतात? झिका व्हायरस कसा पसरतो? झिका व्हायरस होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी? जाणून घेण्यासाठी वाचा.......

मुंबईतील चेंबूर भागात झिका व्हायरचा रुग्ण आढळून आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

झिका हा विषाणू एडिस डास चावल्याने पसरतो. हे डास दिवसा किंवा रात्री कधीही चावतात. पण झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही.

झिका व्हायरस डेंग्यू, चिकुनगुनिया यासारखे साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. एवढंच नाही तर लैंगिक संबंध आणि रक्त संक्रमणाच्या माध्यमातून हे विषाणू पसरतात. या विषाणूचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिलांना आहे. या विषाणूमुळे गर्भवती महिलेपासून तिच्या गर्भालाही धोका होऊ शकतो.

झिका व्हायरसची लक्षणं काय आहेत?

अनेकांना झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर लक्षणं दिसत नाहीत. तर काही रुग्णांना सौम्य लक्षणं दिसतात. यामध्ये ताप, पुरळ, रॅशेस, डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोळे लाल होणे ही महत्वाची लक्षणं दिसत झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर दिसतात.

झिका व्हायरसपासून वाचण्यासाठी काय घ्यावी खबरदारी?

डासांपासून वाचण्यासाठी मच्छरदानीचा किंवा मॉस्किटो रेपेलंट यांचा वापर करावा. त्याबरोबरच आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.

नारळाच्या कवट्या, टायर, फुटलेले डबे यांची योग्य विल्हेवाट लावावी.

महिला आणि पुरुषांनी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी 2-3 महिने सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले पाहिजे.

प्रवास करताना संसर्गाची लागण झाली आहे की नाही? याची तपासणी करावी.

(टीप- या लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून त्याची मॅक्स महाराष्ट्र पुष्टी करत नाही. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा अवलंब करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:    

Similar News