ममता बॅनर्जी यांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचं काय झालं?

Update: 2021-05-03 09:08 GMT

पश्चिम बंगालची निवडणूक असो वा महाराष्ट्राची कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या निवडणूकीपुर्वी अनेक पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करत असतात. मात्र, या नेत्यांना जनता स्विकारते का? महाराष्ट्रमध्ये देखील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तत्कालीन कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, विखे पाटील, मधुकरराव पिचड यांच्यासारख्या राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्री पदी राहिलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, यातील विखे पाटील वगळता सर्वांचा दारुन पराभव झाला.

त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील तृणमूल कॉंग्रेसचे शुभेंदु अधिकारी, राजीब बॅनर्जी, रबींद्रनाथ भट्टाचार्य, अभिनेता रूद्रनील घोष आणि रथिन चक्रवर्ती या नेत्यांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडत भाजपचं कमळ हातात घेतलं. मात्र, भाजपचं कमळ हातात घेऊनही या लोकांना विजय मिळवला का? याचं उत्तर नाही असं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढलेल्या शुभेंदु अधिकारी वगळता एकही तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला आमदार जिंकला नाही. माजी मंत्री राजीब बॅनर्जी, सिंगुरचे माजी आमदार रबींद्रनाथ भट्टाचार्य, अभिनेता रूद्रनील घोष आणि हावड़ा चे माजी महापौर रथिन चक्रवर्ती यांचा या निवडणूकीत पराभव झाला.

मात्र, 2017 मध्ये भाजपमध्ये सहभागी झालेल्या मुकुल रॉय कृष्णानगर मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी तृणमूल कॉंग्रेसचे उमेदवार कौशानी मुखर्जी यांना 35,000 हजार मतांनी हरवलं. काही महिन्यांपुर्वी भाजपमध्ये सहभागी झालेले मिहिर गोस्वामी यांनी तृणमूलचे उमेदवार रबींद्रनाथ घोष यांचा पराभव करून नाताबारी मतदार संघाचे आमदार झाले.

Tags:    

Similar News