बंडातात्यांची अडीच तास झाडाझडती, तात्पुरत्या जामिनावर सुटका

Update: 2022-02-04 10:50 GMT

खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी किर्तनकार बंडातात्या कराडकर अडचणीत आले आहेत. बंडातात्या यांच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. तब्बल अडीच तास त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी दिली आहे. बंडातात्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आल्यानंतर बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

व्यसनमुक्त युवक संघटेने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील काही नेते आणि त्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडता तसेच याचे पुरावेसुद्धा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचासुद्धा उल्लेख केला होता. त्यामुळे राज्यभरातून तीव्र शब्दात टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले आहे, तसेच बंडा तात्यांवर कारवाईची मागणी केली होती.

बंडातात्य यांनी माफी मागतांनाही माध्यमांवरच खापर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच आढेवेढे घेणाऱ्या बंडात्यांनी माध्यमांवर खापर फोडून स्वत:चा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. "मी बोलण्याच्या ओघात अनावधानाने काही राजकीय नेत्यांची नावे घेऊन आरोप केले त्याच्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो" असे बंडातात्या यांनी सांगितलं आहे. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल आपण जे बोललो ते निराधार असून त्यांची आपण माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Full View

Similar News