जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या नरकयातना कायम, आरोग्य व्यवस्था फोल

Update: 2020-06-14 08:32 GMT

जळगावमधील कोवीड रुग्णालयात कोरोनाबाधीत वृद्ध महिलेचा मृतदेह आठ दिवस शौचालयत पडून असल्याचा प्रकार ताजा असतांना पुन्हा रुग्णालयांच्या सुरक्षेचा आणि सुविधांचा गंभीर प्रश्न समोर आला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यान रुग्णालय़ कमी पडत आहेत. यामुळं जिल्हा पप्रशासनाने इतर रुग्णालय अधिग्रहित केली आहेत. या अंतर्गत काँग्रेसचे माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांचे गोदावरी मेडिकल कॉलेज जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते.

नंतर पुन्हा कोविड रुग्णांच्या उपचारासाठी डॉ. पाटील यांचं मेडिकल कॉलेज अधिग्रहित करण्यात आलं. मात्रया मेडिकल कॉलेजमध्ये अनेक त्रुटी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शनिवारी जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने रुग्णालयात अक्षरशः पुरासारखं पाणी वाहत होतं. गंभीर आजारी पेशंट असलेल्या हॉस्पिटलमध्ये पाणी शिरलं होतं. रुणांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी डॉक्टर, नर्स नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी जीव मुठीत धरून त्यांना हलवलं. त्यामुळे जळगावची आरोग्य यंत्रणा राम भरोसे असल्याचं पुन्हा एकदा झालंय.

हे ही वाचा..

पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७ हजार ११०

राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० हजारांपर्यंत

कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या या १९ मागण्या

या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाने कोणत्या निकषांवर डॉ . उल्हास पाटील यांच्या रुग्णालयात जिल्हा रुग्णालय हलवण्याचा हट्टाहास केला होता. या रुग्णालयाची पूर्ण तयारी नसतांना परवानगी कशी काय दिली ? योग्य सुविधा होत्या का ? कोणता राजकीय दबाव होता का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Similar News