बच्चू कडूंचा पहिल्याच दिवशी दणका; दोन नायब तहसिलदारांचे निलंबनाचे आदेश

Update: 2020-01-01 13:54 GMT

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्री बच्चू कडू यांनी अकोट येथे जात असताना दर्यापूर उपविभागीय कार्यालय येथे भेट दिली. आणि लगेच उपविभागीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला. त्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या नागरिकांना काही समस्या असल्यास विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास पुढे यायला सांगितले.

तहसीलदार योगेश देशमुख उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या विविध कार्याचा आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यास सांगितले.

हे ही वाचा

शिवसेना खालच्या थराला जाईल वाटले नव्हते – देवेंद्र फडणवीस

नवे वर्ष, नवे संकल्प

रुग्णसेवा करुन मंत्री बच्चू कडूंची कामाला सुरुवात

त्यानुसार तहसील सभागृह मध्ये सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्या वेळेस पुरवठा विभागातील तक्रारीवरून सेवा हमी कायदा अंतर्गत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्याच कायद्या अंतर्गत जिल्ह्यात पहिली कारवाई पुरवठा विभागातील प्रमोद काळे व सपना भोवते यांच्यावर करण्याचे आदेश मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. उद्या याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

Similar News