बाबरी मशीद खटला, सर्व आरोपी निर्दोष

Update: 2020-09-30 07:26 GMT

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बाबरी मशीद खटल्याचा निकाल अखेर सीबीआयच्या विशेष कोर्टाने दिला आहे. कोर्टाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. तेव्हापासून हा खटला सुरू होता. तब्बल २८ वर्षांनंतर याप्रकरणाचा निकाल लागला आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या कटात हे सर्व नेते सहभागी होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. पण कोर्टाने या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

य़ा सुनावणीमध्ये लालकृष्ण अडवाणींसह उमा भारती...मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग, सतीश प्रधान आणि महंत नृत्य गोपालदास हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले. यावेळी न्यायालयाने निकाल देताना मशीद पाडण्यामागे कोणताही कट त्यामुळे यात कोणत्याही गुन्हेगारी स्वरुपाचा कट यात दिसत नाही असे न्यायमूर्ती एस.के.यादव यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.

Similar News