अयोध्या वादग्रस्त जमीन प्रकरण : सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

Update: 2019-08-06 05:57 GMT

सोमवारी जम्मू-काश्मीरचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतल्यानंतर आज मंगळवारी आणखी एका मोठ्या प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या अयोध्यातील वादग्रस्त जमीन प्रकरणाची आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. या सुनवाणी दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षते अंतर्गत पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाखाली ही सुनावणी सुरु आहे.

पाच न्यायाधीशाचे खंडपीठ

यात जस्टिस एसए बोबडे, जस्टिस डीवाई चंद्रचूड़, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस एसए नजीर यांचा समावेश आहे.

ही सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2010 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या 14 याचिकेवर सुरु आहे.

उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय

उच्च न्यायालयाने 2010 ला अयोध्यातील 2.77 एकर वादग्रस्त जमीन प्रकरणात सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला या तिन्ही समित्यांना समसमान जमीन वाटून घेण्याचा आदेश दिला होता.

Similar News