मॅक्स महाराष्ट्र प्रतिनिधीवर हल्ल्याचा प्रयत्न

Update: 2021-05-19 12:58 GMT

औरंगाबाद: औरंगाबाद येथील बोगस डॉक्टरांचा स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्राचे औरंगाबादचे प्रतिनिधी मोसीन शेख यांच्यावर बोगस डॉक्टर आणि गावकऱ्यांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद ग्रामीण भागात कोणतेही डिग्री नसलेले बंगाली डॉक्टर रूग्णांवर उपचार करत असल्याची बातमी 14 मे रोजी मॅक्स महाराष्ट्राने दाखवली होती. त्यानंतर आज आरोग्य विभाग कारवाई करण्यासाठी गेले होते.

यावेळी याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेले मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी मोसीन शेख आणि आरोग्य अधिकारी यांच्यावर चार-पाचशे लोकांचा जमाव चालून आला. मात्र वेळीच पोलीस आले आणि त्यांनी जमावाच्या तावडीतून त्यांना बाहेर काढले.

याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टर आणि गावकऱ्यांवर गुन्हा दखक करण्यात आला आहे. तर गावकऱ्यांनसंबंधित डॉक्टरला पळवून लावले असून, तो फरार झाला आहे.

Tags:    

Similar News