ओडिसाच्या आरोग्यमंत्र्यावर सहायक पोलिस निरीक्षकाने केला गोळीबार, अखेर उपचारादरम्यान मृत्यू

ओडिसाच्या आरोग्यमंत्र्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यानंतर उपचारादरम्यान नबा किशोर दास यांचा मृत्यू झाला.

Update: 2023-01-29 16:56 GMT

ओडिसाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नबा किशोर दास यांच्यावर रविवारी ब्रजराजनगरमध्ये सहायक पोलिस निरीक्षकाकडून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्लात दास गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र त्यानंतर अखेर नबा किशोर दास यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.


ओडिसाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि झारसुगुडाचे आमदार नबा किशोर दास (Naba Kishore Das) यांच्यावर रविवारी ब्रजराजनगरमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षकाने गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात नबा किशोर दास गंभीररित्या जखमी झाले होते. ब्रजराजनगरमध्ये एका कार्यक्रमात नबा किशोर दास सहभागी झाले होते. ब्रजराजनगर येथील गांधी चौकात दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास घडली. नबा किशोर दास कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्यावर गोळ्याचे चार - पाच राऊंड गोळीबार करण्यात आला . त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान नबा किशोर दास यांचे निधन झाले.

नबा किशोर दास यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव भुवनेश्वर येथील रुग्णालयातून घरी नेण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली.

नबा किशोर दास यांच्या निधनानंतर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शोक व्यक्त केला.



Tags:    

Similar News