हिवाळी आधिवेशनाचे ठरले: 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत

कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी नागपूरमधे होणारे विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन मुंबई घेण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाने घेतल्यानंतर आता कोरोना दुसऱ्या लाटेच्या भितीने दोन दिवसाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबर रोजी मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज समितीने घेतला आहे.

Update: 2020-12-03 12:00 GMT

सालाबादप्रमाणे नागपूर कराराला अधीन राहुन विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन नागपूरमधे घेण्यात येते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी आढावा घेतल्यानंतर मागील कामकाज सल्लागार बैठकीत नागपूरऐवजी मुंबईत ७ डिसेंबर घेण्याचे ठरले होते. काल झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत आधिवेशनाला मंजूरी दिली होती. संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे गेल्यानंतर राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. पुर्वनियोजनाप्रमाणे येत्या ७ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार होते. मात्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने हिवाळी अधिवेशन केवळ दोनच दिवस 14 आणि 15 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीनं घेतला आहे.

मुंबईतील सर्व व्यवस्था नागपूरला खास अधिवेशनासाठी हलवण्याऐवजी हिवाळी अधिवेशनच मुंबईत घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे खास अधिवेशनासाठी नागपूरला जाणार्‍या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला होता.

अधिवेशन आयोजित करण्यासाठी सरकारच्या वतीने नागपूर आणि मुंबईमध्ये आढावा घेण्यात आला होता . नागपूर मध्ये केवळ सुरक्षेसाठी प्राप्त 8000 पोलीस राज्याच्या इतर भागातून नागपूर मध्ये बोलावले जातात. विधिमंडळ आणि मंत्रालयाचा मोठा स्टाफ मुंबईतून खास अधिवेशनासाठी नागपूरला जातो.

नागपुर मधील आमदार निवास कोविड सेंटरमधून वापरात होते . त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मुंबईचा घेण्याचा निर्णय झाला होता. महाराष्ट्र राज्य स्थापनेला झालेल्या करारानुसार वर्षातील एक अधिवेशन हे नागपुरात घ्यावे अशी तरतूद आहे.

Similar News